Skip to main content

निसर्गगाथा

शांत निळ्या नभामधे रविचक्र हासे,
मंदासवे सुमधुर सुमगंध भासे ।
गाती विहंग तरूच्या तळी गोड गाणी,
देतो निसर्ग गुरू हा जगण्या प्रणाली ॥ १ ॥
होता समत्व सुख-दुःख हळूच सांगे,
शांती-दिवा हृदयी हा उजळून जागे ।
घेई सखा बनुनी तो जणू सावलीस,
पावे मनी सहज जीव खऱ्या अर्थास ॥ २ ॥
प्रातः क्षणी किरण हे जन जागविती,
आशा नवी हृदय-पुष्प उमलविती ।
कष्टाविणे न मिळतो यशमार्ग येथे,
सांगे निसर्ग जगणे सुख-सूत्र जेथे ॥ ३ ॥

Related content