Skip to main content

दरवळ

Darval

कविता म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नसून, तो एक भावप्रवास आहे. निसर्गाच्या
कुशीत वावरताना कधी शांत निळे नभ, कधी झुळझुळ वाहणारी नदी, तर कधी
वृक्षांचा निःस्वार्थ त्याग मला खूप काही शिकवून गेला. निसर्गहाच माझा खरा गुरू
झाला आणि त्यानंच मला जगण्याचं सुख-सूत्र दिलं.
या संग्रहात निसर्गाच्या विविध रूपांचं वर्णन करणाऱ्या कवितांबरोबरच,
बालपणीच्या निरागस आठवणींना उजाळा देणारी ‘बालगीतं’देखील आहेत.
आईची माया, आजीची गोष्ट, शाळेतले ते आनंदाचे क्षण आणि मैत्रीचा ओलावा
या सर्व भावनांना मी शब्दांत पकडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

Related content