मनाचे कुरुक्षेत्र
कुरुक्षेत्राचा रणसंग्राम पाच हजार वर्षांपूर्वी संपला असेल; पण आपल्या
प्रत्येकाच्या मनात रोज एक नवीन कुरुक्षेत्र उभे राहते. कधी आपण
निर्णयांच्या संभ्रमात असतो, कधी अपयशाच्या भीतीत, तर कधी
नातेसंबंधांच्या गुंतागुंतीत. अशा वेळी आपल्याला गरज असते एका
अशा आवाजाची, जो आपल्याला सांगेल, ‘उठ, तू एक योद्धा आहेस!’
हे पुस्तक म्हणजे त्याच आवाजाचा,
म्हणजेच भगवद्गीतेचा एक आधुनिक अनुवाद आहे.