Skip to main content

प्रमुख स्तोत्र

"रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे..."

 स्तोत्र पठण केवळ धार्मिक विधी नाही, तर विज्ञानाच्या दृष्टीनेही स्तोत्रांमधील अक्षरांचे उच्चार आपल्या शरीरात आणि भोवतालच्या वातावरणात 'पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स' (S सकारात्मक लहरी) निर्माण करतात. यामुळे एकाग्रता वाढते, ताणतणाव कमी होतो आणि मनाला आंतरिक शांतता लाभते.

स्तोत्र पठणाचे शास्त्रशुद्ध नियम (Rules for Chanting)

स्तोत्रांचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी काही साध्या गोष्टी पाळल्या जातात:

  • वेळ: पहाटे (सूर्योदयाच्या वेळी) किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी स्तोत्र म्हणणे सर्वात उत्तम मानले जाते.
  • उच्चार: स्तोत्रांचे उच्चार स्पष्ट आणि खणखणीत असावेत, ज्यामुळे ध्वनीलहरी (Sound Waves) योग्य रीतीने काम करतात.
  • आसन: नेहमी जमिनीवर चटई किंवा आसन टाकून, पाठीचा कणा ताठ ठेवून बसावे.

Related content