गौरवशाली साहित्य परंपरा
मराठी साहित्य हे केवळ कथा-कादंबऱ्यांपुरते मर्यादित नाही. शिलालेख, महानुभाव पंथाचे वाङ्मय, संतांची प्राकृत भाषा, शाहिरांचे पोवाडे, बखर वाङ्मय आणि आधुनिक काळातील ज्ञानपीठ विजेते साहित्य या सर्वांनी मिळून मराठीचा हा सोन्याचा संसार उभा केला आहे.